भारतीय लष्करानं मागच्या एका वर्षामध्ये जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानचं शस्त्र संधीचं उल्लंघन आणि दहशतवादी कारवयांचा ठोस समाचार घेतला आहे.
भारतानं पाकिस्तानच्या १३८ सैनिकांचा खात्मा केला तर पाकिस्तानचे १५५ सैनिक जखमी झाले. सीमेवर गोळीबारी आणि अन्य घटनांमुळे भारताचे ७० सैनिक जखमी झाले. २०१७मध्ये पाकिस्ताननं ८६० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.२५ डिसेंबर ला भारताच्या ५ सैन्य कमांडोंच्या समुहान नियंत्रण रेषा पार केली आणि पाकिस्तानच्या ३ सैनिकांना कंठस्नान घातलं होतं. मागच्या वर्षी स्नायपर फायरिंगमध्ये भारतानं पाकिस्तानच्या २७ सैनिकांना ठार केलं. तर एलओसीवर पाकिस्तानी स्नायपर फायरिंगमध्ये भारताचे ३ जवान शहीद झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews